चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र भारतात स्थापन होणार

Spread the love

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने भारतात चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठीचे केंद्र स्थापन करण्याची घोषणा 11 ऑक्टोबर 2018 रोजी केली.

चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्र
  • हे केंद्र महाराष्ट्रात स्थापन केले जाईल. या केंद्राने ड्रोन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे तीन प्रकल्प सुरूवातीला हाती घेतले आहेत.
  • हे केंद्र केंद्रशासनाच्या सहकार्याने नवीन तंत्रज्ञानासाठी धोरण आराखडे व तत्वे तयार करण्याचे काम करेल. या कामात उद्योग, अॅकॅडमीक्स, स्टार्ट अप्स व आंतरराष्ट्रीय संघटना यांच्यामधील तज्ज्ञांकडून साहाय्य घेतले जाईल.
  • WEF ने सुरूवातीला महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या राज्यांशी नवीन तंत्रज्ञानात्मक पुढाकारासाठी भागीदारी केली आहे. यापुढे अजून इतर राज्यांशी भागीदारीसाठी WEF प्रयत्न करेल.
  • हा प्रकल्प संपूर्ण भारतभर व जगभर लागू होईल. WEF च्या जागतिक नेटवर्कचा भाग म्हणून भारतातील हे केंद्र सॅन फ्रान्सिको, टोकयो, बीजींग या केंद्राच्या समवेत कार्यरत राहील.
औद्योगिक क्रांतीविषयी माहिती –
आधीच्या तीन औद्योगिक क्रांती खालीलप्रमाणे –
  • पहिली औद्योगिक क्रांती (18व्या शतकाच्या उत्तरार्धात): कापड उद्योगाचे यांत्रिकीकरण, वाफेचे इंजिन.
  • दुसरी औद्योगिक क्रांती (19व्या शतकाचा उत्तरार्ध): विजेचा शोध, वाहतूक, रसायने, स्टील या उद्योगांचा विकास.
  • तिसरी औद्योगिक क्रांती (20व्या शतकाच्या उत्तरार्ध): इलेट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, संगणक या क्षेत्राचा विकास.
चौथी ओद्योगिक क्रांतीविषयी माहिती –
  • ही तिसर्‍या क्रांतीचेच विस्तारित रूप असेल. यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील विकास अतिजलद गतीने होईल.
  • ही क्रांती Cyber-Physical (सायबर-भौतिक) क्षेत्रामधील असेल. यात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence),
  • रोबोटिक्स, बिगडाटा अॅनॅलिटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, नॅनो तंत्रज्ञान, क्वांटम कम्युटिंग यांचा समावेश असेल.

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *