नगरपरिषद-नगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती

Spread the love

 • 10,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात नगर परिषदेची स्थापना केली जाते.
 • नगरपरिषदेचे अ,ब,क असे तीन वर्ग करण्यात आले आहेत.
 • 10,000 ते 30,000 लोकसंख्येसाठी ‘क’ वर्ग नगरपरिषद, 30,000 ते 75,000 लोकसंख्येसाठी ‘ब’ वर्ग नगरपरिषद तर 75,000 पेक्षा जास्त लोकसंख्येसाठी ‘अ’ वर्ग नगरपरिषद असते.
 • नगर परिषदेवर प्रौढ मतदान पद्धतीने उमेदवार निवडून दिले जातात.
 • नगर परिषदेवर प्रौढ मतदान पद्धतीने उमेदवार निवडून दिले जातात.
 • नगर परिषेदेवरील सदस्यास ‘नगरसेवक’ म्हणतात.
 • नगरसेवेकातून एकाची नगराध्यक्ष व एकाची उपनगराध्यक्ष म्हणून निवड केली जाते.
 • नगरपरिषदेचा कालावधी 5 वर्षाचा असतो म्हणजेच दर पाच वर्षानी नगरपरिषदेच्या निवडणुका होतात.
 • नगराध्यक्षाचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.
 • नगराध्यक्षावर आणला गेलेला अविश्वास ठराव एकदा फेटाळला गेल्यास दूसरा अविश्वास ठराव किमान एक वर्ष आणता येत नाही.
 • नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यासाठी किमान 50% नगर सेवकांची अनुमती लागते.
 • नगराध्यक्षावरील अविश्वास ठराव पास होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते.
 • नगर पालिकेचे वार्ड्स जिल्हाधिकारी निर्माण करतात.
 • आपल्या शहरात सांडपाण्याची व्यवस्था करणे, जन्ममृत्युची नोंद ठेवणे, आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देणे ही नगरपरिषदेची आवश्यक कामे आहेत.
 • मुख्याधिकार्‍याची निवड MPSC मार्फत तर नेमणूक राज्यशासन करते.
 • नगरपालिका/परिषद बरखास्त करण्याचा अधिकार राज्यशासनास असतो.
 • नगर परिषदेची सभासद संख्या कमीत कमी 20 असते.
 • नगर परिषदेमध्ये 5 विषय समित्या असतात.
 • सध्या महाराष्ट्रात 223 नगरपरिषदा आहेत.

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *