नौदल दिन आणि कराची अटॅक :/ एक इतिहास मांडण्याचा प्रयत्न

Spread the love

नौदल दिन आणि कराची अटॅक :/ एक इतिहास मांडण्याचा प्रयत्न

४ डिसेंबर रोजी नौदल दिनाच्या साजरा केला जातो. याचा इतिहास मांडण्याचा छोटा प्रयत्न.
१९७१ भारत पाकिस्तान युध्दात नौदलाच्या एक अजब कारवाईमुळे भल्याभल्यांनी तोंडांत बोट घातले अगदी अमेरिका आणि रशियाने पण. रशियाने मुंबई सारख्या बंदराचे रक्षण करण्यासाठी काही मिसाइल बोट भारताला दिलेल्या होत्या. तेव्हा भारताकडे इतर कोणत्याही जहाजावर मिसाइल नव्हते.या बोटी छोट्या असल्याने त्यांची प्रवास आणि रडारची क्षमता अत्यंत मर्यादित होती.
यापैकी निर्घट, निप्पात आणि वीर या तीन बोटींचा वापर करत कराची बंदरावर मिसाइल हल्ला करण्याची योजना आखली. ओखा बंदराचे जवळ या बोटी गस्त घालत होत्या. त्यांचे सोबत किलतान आणि कच्छल या दोन पेटीया वर्गातील जहाजे आणि एक आॅईल टॅंकर “पोषक” असा “कराची स्ट्राईक गट” तयार केला गेला.
दोन जहाजांनी मिसाइल बोट (क्षमता वाढविण्यासाठी तेलाची बचत करण्यासाठी) ओढत नेत (Tow) हा गट कराची समुद्रतटाच्या दक्षिणेला ४६० कि.मी एका. अरबी समुद्रात नियोजित स्थळी ४/१२/१९७१ रोजी पोहचला आणि कमांडर बब्रुवाहन यादव यांचे नेतृत्वाखाली मिसाइल बोटींचा गट अलिप्त होत हल्ल्यासाठी सज्ज झाला. त्याकाळी पाकिस्तान वायुदलाकडे रात्री हल्ले करण्याची क्षमता नव्हती त्यामुळे हा गट सुरक्षित होता. आता सुर्योदयापुर्वी हल्ला करण्याची योजना होती. (याला dusk – dwan हा क्षब्द आहे)

रात्रीत गट कराचीच्या १२० – १५० कि.मी पर्यंत नजीक पोहचला जेथून शत्रुची जहाजे आणि इतर लक्ष्य हल्ल्यासाठी निश्चित करण्यात आली होती.
निर्घट वरून पहिला मिसाइल खैबर जहाजावर डागण्यात आला. जहाजावर विमान हल्ला झाला असा समज झाल्याने त्यांनी विमान विरोधी तोफांचा भडीमार सुरु केला तोच दुसर्या  मिसाइलने खैबरला जलसमाधी दिली. काय होतेय हे कळण्यापुर्वीच निप्पात आणि वीर यांनी दोन मिसाइल डागले. एक पाकिस्तानी सैन्यासाठी दारूगोळा घेऊन जाणारे “एम व्ही व्हिनस” वर आणि दुसरा पाकिस्तान नौदलाचे जहाज ‘मुहाफिज’. व्हिनसवर आगडोंब उसळला तर मुहाफीज जबर  जायबंदी झाले.
निर्णायक टार्गेट होते कराची बंदरावरील “केमराई” तेलसाठ्याचे मोठ्या टाक्या. त्यांचेवर मिसाइल धडकताच महाकाय अग्नितांडवाने पाकिस्तान नौदलाचे कंबरडे भारतीय नौदलाच्या छोट्या जहाजांनी मोडले  उगवत्या सुर्याच्या साक्षीने जगजाहीर झाले. नौदलाच्या कल्पकतेला भल्याभल्यांनी सलाम केला.
त्यामुळे ४ डिसेंबर हा नौदल दिनाच्या साजरा केला जातो. सर्व आजी माजी सैनिकांना शुभेच्छा.💐💐
काॅ. अॅड. वसंत नलावडे, सातारा


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *