मुलींसाठी असलेली सावित्रीबाई फुले शिष्यवत्ती योजना :- सरकारी योजना

Spread the love

सावित्रीबाई फुले शिष्यवत्ती योजना :- सरकारी योजना 
 मागासवर्गीय मुलींचे प्राथमिक शाळांमध्ये गळतीचे प्रमाण अधिक आढळून येते . या गळतीच्या कारणांची कारणमिमांसा करता , मुलींच्या पालकांना रोजगारासाठी बाहेर जावे लागते . कुटूंबाची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे पालक मुलांना रोजगारासाठी मदत म्हणून शेतावर व इतरत्र कामावर घेवून जातात .

परिणामी शाळेतील गळतीचे प्रमाण वाढते . सबब मुलींना शिक्षण देण्याची प्रवृत्ती पालकांमध्ये वाढण्याच्या हेतूने इयत्ता ५वी ते ७वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती देण्याचा शासन निर्णय दि . १२ जानेवारी , १९९६ रोजी निर्गमित करण्यात आला . याच धर्तीवर इयत्ता ८वी ते १० मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुलींसाठी ” सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ” दि . २३ मे , २००३ च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली . त्यानंतर इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती , भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मुलींसाठी सन २००३ – २००४ या शैक्षणिक वर्षापासून ही योजना दि . २५ जुलै , २००३ च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली . 

● सदर योजनेंतर्गत अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत : 
१ ) उत्पन्न व गुणांची अट नाही .
 २ ) विद्यार्थीनींची उपस्थिती नियमित असणे आवश्यक राहील . 
 ● योजनेचे स्वरुप – 
इयत्ता शिष्यवृत्ती दर ५ वी ते ७ वी रु . ६० / – द . म . ८ वी ते १० वी । रु . १०० / – द . म .
शासन निर्णय क्र . 
१ ) इबीसी२००३ / प्र . क्र . ११६ / मावक २ , दि . २३ मे , २००३ . 
२ ) इमाव२००३ / प्र . क्र . २०१ / मावक ३ , दि . २५ जुलै , २००३ . 

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *