४ जानेवारी चालू घडामोडी/दिनविशेष :- govjob24.com

Spread the love

🌹🌷४ जानेवारी दिनविशेष🌷🌹

🌷जागतिक दिवस:
ब्रम्हदेश (म्यानमार) चा मुक्तिदिन

🌷महत्त्वाच्या घटना:

२०१० : ’बुर्ज खलिफा’ या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्‍घाटन झाले.
१९९६ : साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या ’बिंब प्रतिबिंब’ या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.
१९५९ : लूना – १ हे अंतराळयान चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले.

१९५८ : १९५३ मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण धॄवावर पोहोचले.
१९५४ : मेहेरचंद महाजन यांनी भारताचे ३ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९५२ : ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकेबंदी केली.
१९४८ : ब्रम्हदेश (म्यानमार) ला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९४४ : १० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला.
१९३२ : सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरूंना दोन वर्षांची शिक्षा
१९२६ : क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.
१८८५ : आंत्रपुच्छ (appendix) काढुन टाकण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. विल्यम डब्ल्यू. ग्रांट यांनी मेरी गार्टसाईड या रुग्णावर केली.
१८८१ : लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे ’केसरी’ या वृत्तपत्राची सुरूवात केली.
१६४१ : कर भरायला नकार देणार्‍या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शिरला. या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली. त्यात चार्ल्सचा पराभव होऊन मग त्याचा शिरच्छेद करण्यात आला.

🌷जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४१ : कल्पनाथ राय – केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९९ – नवी दिल्ली)
१९२५ : प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता (मृत्यू: २७ आक्टोबर २००१)
१९२४ : विद्याधर गोखले – नाटककार व संपादक (मृत्यू: २६ सप्टेंबर १९९६)
१९१४ : इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका (मृत्यू: १३ जुलै २०००)
१८१३ : सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक (मृत्यू: १२ जानेवारी १८९७)
१८०९ : लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (मृत्यू: ६ जानेवारी १८५२)

🌷मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९४ : राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (जन्म: २७ जून १९३९)
१९६५ : टी. एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २६ सप्टेंबर १८८८)
१९६१ : आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १८८७)
१९०८ : राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिन्दूधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते. (जन्म: ११ नोव्हेंबर १८५१ – कशेळी, राजापूर, रत्‍नागिरी)
१९०७ : गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, ’सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (जन्म: २० आक्टोबर १८५५ – नडियाद, गुजराथ)
१७५२ : गॅब्रिअल क्रॅमर – स्विस गणिती (जन्म: ३१ जुलै १७०४)


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *