RBI कडून कर्जविषयक सार्वजनिक रजिस्ट्रीची स्थापना

Spread the love


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जविषयक माहितीची सार्वजनिक डिजिटल रजिस्ट्री नोव्हेंबर 2018 पासून चालू केली आहे. या रजिस्ट्रीमध्ये कर्ज घेणार्‍या व्यक्ती व कंपन्यांची कर्जविषयक माहिती सार्वजनिक केली जाईल. भारतीय अर्थव्यवस्थेतील बुडीत कर्ज्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर PCRची स्थापना करण्याचा निर्णय महत्वपूर्ण आहे.

 • PCR ही कर्जदाराविषयी वैध व बारीकसारीक सखोल माहिती असलेली डिजिटल रजिस्ट्री आहे.
 • या रजिस्ट्रीमध्ये पुढील माहिती समाविष्ट असेल.
  कर्जदाराची (Borrowers) सखोल माहिती.
  मुद्दाम दिवाळखोर बनलेल्या व्यक्ती/कंपनीची माहिती.
  कर्जदारांवर असलेले कायदेशीर खटले.
  कर्जदाराची पुढील संस्थांकडून मिळालेली माहिती.
  i) सेबी (SEBI).
  ii) उद्योग व्यवहार मंत्रालय.
  iii) जीएसटी नेटवर्क (GSTN).
  iv) भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळ (IBBI).
  या रजिस्ट्रीमुळे सध्याच्या व पुढील कर्जदारांची 360° वित्तीय प्रोफाईल उपलब्ध होईल.
 • ही रजिस्ट्री वित्तीय माहितीची साधनसामग्री म्हणून काम करेल व विविध संस्थांना संबंधित माहिती पुरवेल. त्यामुळे सध्याची कर्जविषयक माहितीव्यवस्था समृद्ध होईल.
 • बँकांना कर्जपुरवठा करताना ही माहिती एकाच ठिकाणी प्राप्त होईल.
 • PCR ची स्थापना करण्याची शिफारस वाय.एम. देवस्थळे समितीने केली होती.
 • सध्या भारतात वेगवेगळ्या कर्जविषयक माहिती रजिस्ट्री आहेत.
  i) RBI ची Central Repository of Information of Large Credit (CRILC).
  ii) 4 खासगी कर्जविषयक माहिती कंपन्या (Credit Information Companies).
YOU MIGHT ALSO LIKE

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *