STI Pre Exam Question Set 1

Spread the love

1. जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला?
 1.  15 ऑगस्ट 2013
 2.  24 ऑगस्ट 2013
 3.  26 ऑगस्ट 2013
 4.  वरील पैकी कोणतेही नाही
उत्तर : 26 ऑगस्ट 2013

2. कुत्रिम पाय असूनही माऊंट एवरेस्ट वर विजय प्राप्त करणारी जगाची पहिली महिला पर्वतारोही अरुणिमा सिन्हाला तिच्या या कार्यात कोणत्या संस्थेने सहकार्य केले?
 1.  जमनालाल बजाज फाउंडेशन
 2.  धन्वतंतरी फाउंडेशन
 3.  के.के. बिर्ला फाउंडेशन
 4.  टाटा स्टील एडव्हेंचर फाउंडेशन
उत्तर : टाटा स्टील एडव्हेंचर फाउंडेशन

3. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जकाती ऐवजी स्थानिक संस्था कर (LBT) लागू होण्याची तारीख
 1.  1 एप्रिल 2013
 2.  1 ऑक्टोबर 2013
 3.  1 एप्रिल 2014
 4.  1 ऑक्टोबर 2014
उत्तर : 1 एप्रिल 2014

4. जुलै 2013 मध्ये सर्वोच न्यायालयाने गुन्हेगार लोकप्रतिनिधींचे (खासदार-आमदार) सदस्यत्व निकाल लागलेल्या दिवशी रद्द करण्याबाबतचा निर्णय दिला. त्यानुसार —— पेक्षा जास्त शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना हा निर्णय लागू होणार आहे.
 1.  6 महीने
 2.  1 वर्ष
 3.  2 वर्ष
 4.  6 वर्ष
उत्तर : 2 वर्ष

5. डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही?
 1.  भ्रम आणि निराश
 2.  अंधश्रद्धा विनाशाय
 3.  मती भानामती
 4.  पुरोगामी विचार
उत्तर : पुरोगामी विचार

6. जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर ‘Tianhe-2’ हा —— या देशाने बनविला आहे.
 1.  अमेरिका
 2.  चीन
 3.  जपान
 4.  जर्मनी
उत्तर : चीन

7. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?
 1.  मराठी
 2.  सिंधी
 3.  मारवाडी
 4.  संथाली
उत्तर : मारवाडी

8. एका पेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधीकरता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत?
 1.  श्री. शंकरराव चव्हाण
 2.  श्री. यशवंतराव चव्हाण
 3.  श्री. वसंतराव पाटील
 4.  श्री. शरदचंद्र पवार
उत्तर : श्री. यशवंतराव चव्हाण

9. ब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?
 1.  ठाणे
 2.  अंदमान
 3.  मंडाले
 4.  एडन
उत्तर : एडन

10. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
 1.  नीळ
 2.  भात फक्त
 3.  गहू फक्त
 4.  भात व गहू
उत्तर : भात व गहू

11. ‘श्रीपती शेषाद्री प्रकरण’ ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.
 1.  जगन्नाथ शंकर सेठ
 2.  बाळशास्त्री जांभेकर
 3.  भाऊ दाजी लाड
 4.  छत्रपती शाहू महाराज
उत्तर : बाळशास्त्री जांभेकर

12. पर्वतीय वार्‍यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?
 1.  अमेरिका आणि मेक्सिको
 2.  अमेरिका आणि कॅनडा
 3.  ब्राझिल आणि अर्जेटीना
 4.  ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
उत्तर : अमेरिका आणि कॅनडा

13. खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?
 1.  ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे
 2.  अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात
 3.  या विहिरी नैसर्गिक वायु पुरवतात.
 4.  वरील कोणतीही नाही
उत्तर : वरील कोणतीही नाही

14. —–% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.
 1.  79
 2.  59
 3.  49
 4.  39
उत्तर : 49

15. रेडी बंदर हे —— च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे.
 1.  आंबा
 2.  नैसर्गिक वायु
 3.  कोळसा
 4.  लोह खनिज
उत्तर : लोह खनिज

16. कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते?
 1.  सिमेंट उद्योग
 2.  चर्मोद्योग
 3.  काच उद्योग
 4.  रबर माल उद्योग
उत्तर : रबर माल उद्योग

17. भारतातील कोणकोणत्या राज्यावरुन कर्कवृत्त जाते?
 1.  गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मणीपुर
 2.  गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मेघालय
 3.  गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोरम
 4.  गुरजात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, नागालँड
उत्तर : गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोरम

18. ‘गरीबी हटाओ’ घोषणेने कोणती पांचवार्षिक योजना सुरू करण्यात आली?
 1.  तिसरी पंचवार्षिक योजना
 2.  पाचवी पंचवार्षिक योजना
 3.  सहावी पंचवार्षिक योजना
 4.  सातवी पांचवार्षिक योजना
उत्तर : सहावी पंचवार्षिक योजना

19. 2011-12 मध्ये भारताच्या रुपयाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या विकसनशील अर्थव्यवस्थांच्या चलनाचे अवमूल्यन झाले?
 1.  ब्राझिल मेक्सिको, रशिया
 2.  मेक्सिको, साऊथ कोरिया, जर्मनी
 3.  रशिया, साऊथ आफ्रिका, हाँगकाँग
 4.  साऊथ कोरिया, जपान, चीन
उत्तर : ब्राझिल मेक्सिको, रशिया

20. खालीलपैकी कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्रासाठीचा कर्जपुरवठा 40 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर कमी करण्याची शिफारस केली?
 1.  स्वामिनाथन समिती
 2.  चेलय्या समिती
 3.  नरसिंहम समिती
 4.  केळकर समिती
उत्तर : नरसिंहम समिती
****************************************************************
1. एकूण स्थूल देशांतर्गत (घरेलू) उत्पादनात शेती क्षेत्राचा सहभाग, 1900-2000 किमतींवर, टक्केवारीच्या स्वरुपात 1950-51 च्या 56.5 पासून 2012-2013 च्या 13.6 पर्यंत घसरला आहे. यात शेतीच्या व्याख्येत काय सम्मिलीत आहे?
 1.  केवळ शेती
 2.  शेती व वने फक्त
 3.  शेती व मत्स्यव्यवसाय फक्त
 4.  वरील एकही पर्याय योग्य नाही
उत्तर : वरील एकही पर्याय योग्य नाही

2. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून —— हे औषध वापरतात.
 1.  नॅलिडीक्सिक अॅसिड
 2.  अॅस्पिरीन
 3.  पॅरासिटामॉल
 4.  रॅनटक
उत्तर : अॅस्पिरीन

3. सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनीविषयक दर्जा हा निष्कृष्ट ठरण्याचे कारण —– असते.
 1.  आंतर परावर्तन
 2.  सस्पंदन
 3.  निनाद
 4.  स्पंदन
उत्तर : निनाद

4. समुद्राची खोली मोजण्यासाठी —– वापरतात.
 1.  वर्णलेखन तंत्रज्ञान
 2.  सोनार तंत्रज्ञान
 3.  निष्कर्षण तंत्रज्ञान
 4.  अपवर्तनांकमापी
उत्तर : सोनार तंत्रज्ञान

5. डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो, कारण त्याचे
 1.  बाष्पीभवन होते
 2.  संघनन होते
 3.  संप्लवन होते
 4.  यापैकी नाही
उत्तर : संप्लवन होते

6. —— वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.
 1.  पृथ्वीच्या ध्रुवावर
 2.  पृथ्वीच्या विषुववृत्तावर
 3.  पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये
 4.  पृथ्वीच्या पृष्ठभागावर
उत्तर : पृथ्वीच्या ध्रुवावर

7. स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे?
 1.  लोखंड व कार्बन
 2.  लोखंड, क्रोमीअम व निकेल
 3.  लोखंड, क्रोमीअम व कोबाल्ट
 4.  लोखंड, टिन व कार्बन
उत्तर : लोखंड, क्रोमीअम व निकेल

8. ‘डेटॉल’ मधील हा मुख्यघटक असतो –
 1.  बायथायनॉल
 2.  टिंक्चर आयोडीन
 3.  बोरिक अॅसिड
 4.  क्लोरोझायलेनॉल
उत्तर : क्लोरोझायलेनॉल

9. —— ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते.  
 1.  लालोत्पादक ग्रंथी
 2.  यकृत
 3.  स्वादुपिंड
 4.  जठरग्रंथी
उत्तर : यकृत

10. मानवी शरीरात जवळजवळ —— किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात.
 1.  10,000
 2.  98,000
 3.  97,000
 4.  98,500
उत्तर : 97,000

11. विंचू हा —— प्राणी आहे.
 1.  अंडी देणारा
 2.  पिलांना जन्म देणारा
 3.  वरीलपैकी दोन्ही
 4.  यापैकी कोणतेही नाही
उत्तर : पिलांना जन्म देणारा

12. खालीलपैकी खगोलशास्त्रीय वस्तूंचा त्यांच्या आकारमानाप्रमाणे योग्य चढताक्रम कोणता?
 1.  सूर्य, सूर्यमाला, पृथ्वी, विश्व, आकाशगंगा
 2.  विश्व, आकाशगंगा, सूर्यमाला, पृथ्वी, सूर्य
 3.  सूर्यमाला, पृथ्वी, सूर्य, विश्व, आकाशगंगा
 4.  वरील एकही नाही
उत्तर : वरील एकही नाही

13. घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण
 1.  जास्त विद्युतभार मिळवण्यासाठी
 2.  जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी
 3.  ही जोडणी सोपी आहे
 4.  वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर : जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी

14. खालीलपैकी कोणत्या धातूकेमध्ये तांबे व लोखंड आहेत?
 1.  मॅलचाईट
 2.  चालकोपायराईट
 3.  चालकोसाईट
 4.  अझुराईट
उत्तर : चालकोपायराईट

15. एका माध्यमाकडून दुसर्‍या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना, त्याला —— म्हणून ओळखले जाते.
 1.  परावर्तन
 2.  अपवर्तन
 3.  अपस्करण
 4.  अपसरण (विचलन)
उत्तर : अपवर्तन

16. गॅंबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते?
 1.  डोकेदुखी
 2.  हगवण
 3.  डायरिया
 4.  निद्रानाश
उत्तर : डोकेदुखी

17. एका सांकेतिक भाषेत KOLHAPUR हा शब्द PLOSZKFI असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत TASGAON हा शब्द कसा लिहिला जाईल?
 1.  GZTZLMH
 2.  GZHTZIM
 3.  GZHTAZM
 4.  GZHLMZT
उत्तर : GZHTZIM

18. चार विद्यार्थ्यांची उंची W,X,Y,Z अशी आहे आणि 2X=W+Z, 2W=X+Y, 2Y=W तर त्यांच्या उंचीनुसार क्रम कसा असेल?
 1.  W<Y<X<Z
 2.  Y<W<X<Z
 3.  X<Z<Y<W
 4.  Z<X<W<Y
उत्तर : Y<W<X<Z

19. एका अक्षर मालिकेची विविध पदे दिलेली आहेत. त्यापैकी प्रश्नार्थक चिन्हाने (?) दर्शविलेले पद गाळलेले आहे. ते गाळलेले पद, दिलेल्या पर्यायांमधून शोधा.
ak, eo, is, (?), qa, ue
 1.  lv
 2.  mw
 3.  lw
 4.  mv
उत्तर : mw

20. 4 ने पूर्ण भाग जाणार्‍या तीन-अंकी संख्या किती आहेत?
 1.  220
 2.  224
 3.  225
 4.  228 
उत्तर : 225


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *